आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मै तेरा हीरो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये कॉमेडी किंग म्हणून ओळखले जाणारे दिग्दर्शक डेविड धवन पुन्हा एकदा 'मै तेरा हीरो'च्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवण्यासाठी येत आहेत. त्यांनी आपल्या दिग्दर्शनाअंतर्गत बनवलेल्या 'मै तेरा हीरो' या आगामी सिनेमात मुलगा वरुण धवनला मुख्य भूमिकेत घेतले आहे. वरुणसोबत सिनेमात इलियाना आणि नर्गिस फाखरीला कास्ट करण्यात आले आहे.
सिनेमाच्या कहाणीत वरुणला इलियानावर जिवापाड असते. त्याला तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा असते. तोच त्यांच्या प्रेमात खलनायकाची एंट्री होते. खलनायकाची भूमिका अरुणोदय सिंहने साकारली आहे. तो एक भ्रष्ट पोलिस असतो. त्यालाही इलियानावर प्रेम असते. म्हणून तो तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकतो. त्याचवेळी नर्गिस फाखरीच्या एंट्रीने सिनेमात टि्वस्ट येतो. नर्गिसचे पात्र वरुणवर जिवापाड प्रेम करत असल्याचे दाखवले आहे.
आता वरुण इलियानासोबत लग्न करतो, की नर्गिसोबत हे बघणे रंजक असेल. सिनेमात या प्रेमाच्या त्रिकोणात कॉमेडीसुध्दा भरपूर दाखवण्यात आली आहे.