आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैं तेरा हीरो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये कॉमेडी किंग म्हणून ओळखले जाणारे दिग्दर्शक डेविड धवन पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यास सज्ज झाले आहेत. आपल्या आगामी 'मैं तेरा हीरो' या सिनेमात त्यांनी त्यांचा मुलगा वरुण धवनला दिग्दर्शित केले आहे. या सिनेमातवरुण सोबत सिनेमात इलियाना डिक्रूज आणि नर्गिस फाखरीला कास्ट करण्यात आले आहे.
'मैं तेरा हीरो' हा रोमँटिक अॅक्शन सिनेमा आहे. वरुण धवनचे इलियाना डिक्रूजवर प्रेम असते. इलियानासह लग्न करण्याची त्याची इच्छा असते.
याचदरम्यान या दोघांत एका व्हिलनची एन्ट्री होते. हा व्हिलन अभिनेता अरुणोद्य सिंहने साकारला आहे. तो एक भ्रष्ट पोलिस अधिकारी आहे. अरुणोद्य कोणत्याही परिस्थितीत इलियानाशी लग्न करु इच्छितो. यासाठी तो बळजबरीसुद्धा करतो. नर्गिस फाखरीची एन्ट्री झाल्यानंतर कहाणीत ट्विस्ट येतो. नर्गिसचे वरुणवर जीवापाड प्रेम असते.
आता वरुण इलियाना की नर्गिस कुणाशी लग्न करणार हे सिनेमात बघावे लागणार आहे.