आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मस्तराम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मस्तराम' या सिनेमात ताशा बेरी मुख्य भूमिका साकारत आहे. ताशा यापूर्वी 'गँग्स ऑफ वासेपूर' या सिनेमात दिसली होती. 'मस्तराम' हा अखिलेश जैस्वालचा पहिलाच दिग्दर्शित सिनेमा आहे. तसेच, कपिल दुबे आणि राहूल बग्गासुध्दा या सिनेमातून आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात करणार आहे. अखिलेश या सिनेमात यो यो हनीसिंगच्या अचको-मचको गाण्याचा रॅपसुध्दा आहे.
कदाचित दोन दशकापूर्वी कुणी विचारसुध्दा केला नसेल, की फॉरबिडन जगात नेणारा मस्तराम कधी रुपेरी पडद्यावरसुध्दा अवतरू शकतो. तो एक लेखक आहे. त्याचा ही अश्लिल साहित्यावरील कादंबरी ग्रंथालय, महाविद्यालयामध्ये लोकप्रिय नसून एका बंद खोलीत वाचली जाणारी आहे.
सिनेमाच्या कहाणीला खूपच रंजक पध्दतीने सादर करण्यात आले आहे. ही एका छोट्या शहरातील बँक कर्मचारी राजारामची कहाणी आहे. त्याला दिल्ली शहरात येऊन मोठा लेखक होण्याचे स्वप्न असते. त्याला साहित्यात यश मिळत नाही.
पुस्तक प्रकाशन मालिक त्याच्याकडून साहित्य कथांऐवजी भडक आणि मसालेदार कहाण्यांची मागणी करतो. एक दिवशी त्याची नजर एका सी-ग्रेड सिनेमाच्या पोस्टरवर पडते. त्यानंतर त्याला सर्व समजते. त्यानंतर त्याला आपल्या पत्नीपासून ते शेजारी राहणा-या महिलेपर्यंत सर्वच त्याला बोल्ड भूमिकेत दिसायला लागतात. त्यानंतर मस्त साहित्य लिहीणा-याचे नावच मस्तराम पडते. हा सिनेमा 9 मे रोजी रिलीज होणार आहे.