आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मितवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वप्नील आणि सोनाली यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा आजच्या तरुणाईचे प्रतिनिधित्व करणारा आहे. आजचे युग हे वेगाने पुढे जाणारे आहे. त्यामुळे नातेसंबंध, प्रेम यापलिकडे जाऊन आजची तरुणाई विचार करु लागली आहे. प्रेमाच्या एका कोषात न अडकणारी आजची पिढी आहे. आयुष्याच्या एका विशिष्ट वळणावर आल्यानंतर प्रत्येकाला 'मितवा'ची गरज असते. या नातेसंबंधांवरच भाष्य करणारा हा सिनेमा आहे.
निर्माती-दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे. तर रामानंद सागर यांची नात आणि मोती सागर यांची मुलगी असलेल्या मिनाक्षी सागर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. शंकर-एहसान-लॉय या प्रतिभावान संगीतकारांचे संगीत सिनेमाला लाभले आहे.
या सिनेमाचे वेगळेपण म्हणजे 9 एक्स झक्कास वाहिनीवर झालेल्या लक्स झक्कास हिरॉईन टॅलेण्ट हंटचा किताब पटकावणा-या प्रार्थना बेहरेला यात अभिनेत्री म्हणून झळकण्याची संधी मिळाली आहे.