आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक था टायगर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'एक था टायगर' या चित्रपटाला यावर्षीचा मोठा चित्रपट आपण म्हणू शकतो. यशराज हे मोठे बॅनर आणि सलमान खान, कतरिना कैफ ही मोठी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. सलमान खानचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. 'एक था टायगर' या रोमॅण्टिक थ्रिलरमध्ये सलमान खान एका सिक्रेट एजंटच्या भूमिकेत आहे. या सिक्रेट एजंटच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे कतरिना कैफने.
या चित्रपटात सिक्रेट एजंटला टायगर (सलमान खान) हे कोड नाव देण्यात आले आहे..
ट्रिनिटी कॉलेजच्या एका शास्त्रज्ञावर पाळत ठेवून त्यांच्याविषयी माहिती गोळा करण्याची जबाबदारी या टायगरवर आहे. टायगरला ही कामगिरी भारत सरकारने सोपविली असते. कारण हा शास्त्रज्ञ मिसाईल तंत्रासंबंधीची माहिती पाकिस्तानला देणार असल्याची गुप्त माहिती भारत सरकारकडे आहे.
जोया (कतरिना कैफ) त्या शास्त्रज्ञानी केअर टेकर असते. या जोयावर टायगर प्रेम करु लागतो. हा एजेंट आपले प्रेम आणि कर्तव्याला कसे सांभाळतो हे आपल्याला 'एक था टायगर' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाचे चित्रीकरण डबलिन, इस्ताम्बूल, कजाकिस्तान, चिलीसमवेत आणखी काही देशांमध्ये पार पडले आहे. कबीर खान यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.