आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काई पो छे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'काई पो छे' हा हिंदी सिनेमा लेखक चेतन भगत यांच्या '3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ' या कादंबरीवर आधारित आहे. अभिषेक कपूर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. अमित त्रिवेदीने सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. सुशांत सिंग राजपूत, राज कुमार यादव, अमित साध यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. सुशांत सिंग राजपूतचा हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. 'काई पो छे' ही गुजरातीतील म्हण असून त्याचा अर्थ 'आय हॅव कट' असा होता.
'काई पो छे' या सिनेमाची कथा इशान, ओमी आणि गोविंद या तीन मित्रांच्या अवतीभोवती गुंफण्यात आली आहे. या तिघांच्या आयुष्यात येणारे चढउतार या सिनेमात रेखाटण्यात आले आहेत. येत्या 22 फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होतोय.