आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई दोबारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


2010 मध्ये रिलीज झालेल्या 'वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई' या सिनेमाच्या यशानंतर निर्माती एकता कपूर या सिनेमाचा सिक्वेल घेऊन येत आहे. 'वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई दोबारा' या नावाने हा सिक्वेल रिलीज होणार आहे. सिनेमाच्या पहिल्या भागाची कहाणी जिथे संपली होती तेथून सिक्वेलची कहाणी सुरु होणार आहे. पहिल्या भागात शोएब खानची भूमिका इमरान हाश्मीने साकारली होती. आता या सिक्वेलमध्ये ही भूमिका अक्षय कुमार साकारत आहे. कारण या भूमिकेसाठी दिग्दर्शक मिलन लुथरिया यांना सीनिअर कलाकार हवा होता.

आपल्या गुरु सुल्तान मिर्जा (अजय देवगण)ची हत्या करुन शोएब खान (अक्षय कुमार) आता माफिया डॉन झाला आहे. त्याचे साम्राज्य केवळ मुंबईतच नव्हे तर जगभरात पसरले आहे. गुन्हेगारी हाच पेशा असलेला शोएब आपल्या गरीब वस्तीत जाऊन जुन्या आठवणी ताज्या करतो, जिथे त्याचे बालपण गेले होते.

याच वस्तीत शोएबची भेट असलम (इम्रान खान) बरोबर होते. इमरानवर इम्प्रेस झालेला शोएब त्याला आपला शिष्य बनवतो आणि त्याला आपले नुसखे शिकवतो.

नवोदित अभिनेत्री यास्मीन (सोनाक्षी सिन्हा)वर शोएबची नजर पडते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. तर दुसरीकडे शोएबचा शिष्य असलमसुद्धा यास्मीनच्या प्रेमात पडतो. यावरुन या गुरु-शिष्यात तणाव निर्माण होतो.

शोएबचे दोन प्रतिस्पर्धी डॉन वर्धा आणि अरुण त्याचे साम्राज्य संपवण्याचा प्रयत्न करतात. एक पोलिस ऑफिसर त्यांच्या गटात सामील होतो. या सगळ्यांचा उद्देश शोएबला जीवे मारणे हा असतो. त्यामुळे शोएबच्या अडचणीत भर पडते.

यास्मीन कुणाला मिळेल ? शोएबचे साम्राज्य संपुष्टात येणार का ? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी 'वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई दोबारा' हा सिनेमा बघावा लागणार आहे.