आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिज्जा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'पिज्जा' या सिनेमाची कथा कुणाल (अक्षय ओबराय)च्या अवती-भोवती गुंफण्यात आली आहे. कुणाल एक पिज्जा डिलीव्हरी बॉय आहे. त्याचा भूतांवर विश्वास नसतो. हेच तो त्याची लेखिका असलेल्या पत्नीलासुद्धा सागंतो.
मात्र एक दिवस तो एका हॉटेंड घरात अडकतो. या घरात तो पिज्जा डिलीव्हरीसाठी गेलेला असतो. पिज्जा डिलीव्हर केल्यानंतर जेव्हा तो घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला यश मिळत नाही. त्याला घरातील बाथटबमधून मृतदेह बाहेर येताना दिसतो. सिनेमाची पुढील कथा कुणालचे बंगल्यात अडकणे आणि नंतर त्यातून सूटका होण्यावर आधारित आहे.
अलीकडेच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज कणर्‍यात आला. या सिनेमात अक्षय ओबरॉयसह अरुणोद्य सिंह, दीपनिता शर्मा आणि पार्वती ओमनकुट्टम महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. दीपनिता शर्मा या सिनेमात भूताच्या भूमिकेत आहे.