आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियतमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हॅलेंटाईन डे... प्रेमाचा दिवस. जगातील तमाम प्रेमीजन ज्याची आतुरतेने वाट पाहतात असा वर्षातला स्पेशल डे... या दिवसाला खास करण्यासाठी प्रेमी जोड्यांचे प्लानिंग एव्हाना सुरु झाले असेल. या दिवसाला अजून स्वप्नपंखी करण्यासाठी रुपेरी पडद्यावर येतेय एक मराठमोळी लव्हस्टोरी... 'प्रियतमा'.
प्रियतमा... खडकाळ माळरानावर फुललेलं एक हळवं प्रीतस्वप्न. सहज फुल उगवावं तसं मनातून अलगद उगवलेलं.. तिच्या आणि त्याच्या मनातलं... दोघांना प्रेमाच्या पाशात घट्ट जखडून टाकणारं... कधी हळूवार, नाजूक तर कधी तीव्र ओढ लावणारं त्यांचं प्रेम, याच प्रेमाची उत्सुकता वाढवणारी कहाणी असलेला 'प्रियतमा' हा मराठी सिनेमा व्हॅलेंटाईन डेला म्हणजेच 14 फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येतोय. सतिश मोतलिंग यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलंय.
शेक्सपियरच्या रोमियो-जुलिएट या उत्कट प्रेमकहाणीची आठवण करुन देणा-या 'प्रियतमा' सिनेमात नायकाच्या भूमिकेत सिद्धार्थ जाधव तर नायिकेच्या भूमिकेत गिरीजा जोशी झळकणार आहे. या सिनेमात सिद्धार्थ जाधव वेगळ्याच लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक सतीश मोतलिंग यांनी प्रेमाची नवी परिभाषा नव्याने मराठीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.