आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेस 2

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2008 मध्ये रिलीज झालेल्या 'रेस' या सिनेमात स्टायलिश लूक आणि जबरदस्त अ‍ॅक्शन प्रेक्षकांना बघायला मिळाली होते. 'रेस' हा बॉक्स ऑफिसवरचा हिट सिनेमा ठरला होता. आता तब्बल पाच वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. येत्या 25 जानेवारीला 'रेस'चा सिक्वेल 'रेस 2' रिलीज होतोय. या सिनेमाला थ्रिलर आणि सस्पेन्सचा तडका आहे. त्यामुळेच या सिनेमाच्या कथानकाविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.

युरोपच्या सुंदर लोकेशन्सवर हा सिनेमा चित्रीत करण्यात आला आहे. या सिनेमातही जबरदस्त अ‍ॅक्शन सिन्स असणार आहेत. 'रेस 2'मध्ये काही कलाकार बदलण्यात आले आहेत.

'रेस'मध्ये दिसलेले बिपाशा बसू, अक्षय खन्ना, कतरिना कैफ आणि समीरा रेड्डी या सिनेमात दिसणार नाहीत. त्यांच्याऐवजी दीपिका पदुकोण, जॅकलीन फर्नांडिस आणि अमिषा पटेल या सिनेमात दिसणार आहेत. शिवाय सैफ अली खान आणि अनिल कपूर आहेतच.

आपल्या प्रेयसीच्या म्हणजेच सोनियाच्या मृत्यूमुळे रणवीर दुःखी आहे. 'रेस 2'मध्ये रणवीरच्या स्वभावात अनेक बदल दाखवण्यात आले आहेत. तो सोनियाच्या खुनाचा बदला घेण्याचे ठरवतो. यामध्ये आरडी आणि चेरी त्याला मदत करतात. सोनियाच्या खुन्याचा शोध घेताना रणवीरची भेट अरमान मलिक आणि त्याची होणारी बायको ओमिषाबरोबर होते. अरमान विदेशातील इंडियन माफिया आहे. रणवीर आणि अरमानची भेट घडल्यानंतर पुढे कोणकोणत्या घटना घडतात हे 'रेस 2'मध्ये बघायला मिळणार आहे. अब्बास-मस्तान यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.