आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'रागिनी एमएमएस 2\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'रागिनी एमएमएस' सिनेमाची कहाणी जिथे संपली होती तिथूनच 'रागिनी एमएमएस 2'ची कहाणी सुरू होते.
'रागिनी एमएमएस 2' हा 2011मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रागिनी एमएमएस'चा सिक्वल आहे. हा सिनेमा बालाजी मोशन पिक्चर्स आणि ए.एल.टी एंटरटेन्मेंट बॅनरखाली बनवलेला आहे. सिनेमाचे दिग्दर्शक भूषण पटेल आहे. सिनेमाची मुख्य अभिनेत्री पोर्न स्टारपासून अभिनेत्री झालेली सनी लिओन आहे.
सिनेमाची कहाणी रागिनी आणि उदय नावाच्या अशा जोडीविषीयी आहे, जे एका रिकाम्या घरात सुट्टीचा दिवस घालवण्यासाठी जातात. उदयला रागिनीसोबत वीकेंड साजरा करण्याची इच्छा असते. त्यावेळी उदय घरात रागिनीचा एक एमएमएस बनवतो. तेव्हा तिथे काही विचित्र घटना घडू लागतात. उदय तिथून निघून जातो. त्याने बनवलेला एमएमएस नंतर व्हायरल होतो. त्यानंतर त्याला रागिनीची आठवण येते आणि त्याचा शेवट एका हॉस्पिटलमध्ये असताना होतो.
त्यानंतर एका सिनेमा दिग्दर्शकाचे लक्ष या कथेकडे जाते. तो त्यावर एक सिनेमा बनवण्याची योजना करतो. रागिनी (सनी लिओन)च्या पात्रासाठी तो एका अभिनेत्रीची निवड करतो. दिग्दर्शक त्याच घरात सिनेमा शुट करण्याची योजना बनवतो. त्यानंतर क्रू-मेंबरसोबतसुध्दा विचित्र घटना घडायला लागतात.
सिनेमाचे 'बेबी डॉल' हे गाणे रिलीज झाले असून त्याल यू-ट्यूबवर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सोबतच, प्रेक्षकांना 'चार बोटल व्होडका' या गाण्याचीही प्रतिक्षा आहे. या गाण्यात सनी लिओन आणि रॅपर हनीसिंह यांना कास्ट करण्यात आले आहे.