आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत् ना गत्

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मराठी चित्रपटसृष्टीत सध्या गाजलेल्या कादंबरींवर सिनेमे तयार केले जात आहेत. आता या यादीत आणखी एका सिनेमाची भर पडली आहे. ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांच्या ‘सत् ना गत्’या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित याच शीर्षकाचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

‘साई सागर फिल्मस् इंटरनॅशनल’ या बॅनरखाली तयार होणाऱया या आगामी सिनेमाची निर्मिती रेणुका शंकर मिटकरी, मनोज अग्रवाल आणि रामकुमार गुगळे यांची असून दिग्दर्शन राजू पार्सेकर यांनी केले आहे.

नव्वदच्या दशकात प्रकाशित झालेल्या ‘सत् ना गत्’ या कादंबरीने त्या काळात सामाजिक आणि साहित्यिक वातावरण ढवळून काढलं होतं. समाजाच्या वासनांधपणाची शिकार झालेल्या बलात्कारपिडीत ‘नामी’ची कथा यात मांडण्यात आली होती. अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयावर हा सिनेमा बेतला आहे.