आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंघम 2

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘सिंघम-2’ हा एक अॅक्शन सिनेमा आहे. 2011मध्ये रिलीज झालेल्या 'सिंघम' या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. हा सिनेमा अॅक्शन दिग्दर्शक रोहित शेट्टीने दिग्दर्शित केला आहे. रोहित शेट्टीचा गेल्या वर्षी रिलीज झालेला 'चेन्नई एक्स्प्रेस' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. या सिनेमा 227 कोटींचा गल्ला जमवला होता.
‘सिंघम-2’ मध्ये अजय देवगण, करीना कपूर खान मेन लीडमध्ये दिसणार आहेत. 'सिंघम'मध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत होती. ‘सिंघम-2’ हा सिनेमा 'सिंघम'पेक्षा खूप वेगळा असणार आहे. यावेळी हिरोईनची भूमिकासुद्धा सिनेमात दमदार असणार आहे.
अजय आणि करीनासह ‘सिंघम-2’मध्ये अनुपम खेर आणि अमोल गुप्ते यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हिमेश रेशमिया या सिनेमाचा संगीतकार आहे. तर अजय देवगण स्वतः याचा निर्माता आहे. रोहित शेट्टीचा हा अॅक्शनपॅक्ड सिनेमा येत्या 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.