आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तमंचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'तमंचे' दोन गुन्हेगारांच्या कथेवर बेतलेला आहे. त्यातील एक आहे बाबू (रिचा चड्ढा) आणि दुसरे आहे मुन्ना मिश्रा (निखिल द्विवेदी). दोघेही पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी स्वत:चा बचाव करताना दिसतात. परंतु पोलिसांशिवाय आणखी एक व्यक्ती त्यांच्यामागे लागलेला असतो. दोघे वेगवेगळ्या पध्दातीचे असूनही एकत्र येऊन कसे गँगस्टरला धडा शिकवतात हे या सिनेमात मांडले आहे.
दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. परंतु त्याचा परिणाम काय होतो, हेच या सिनेमात दाखवण्यात आले आहे. निखिलचे पात्र सिनेमात एकदम कूल आहे. तसेच, रिचाची भूमिका बोल्ड आहे. तिची भाषासुध्दा टपोरी आहे. सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सांगण्यात आले आहे, की ही एक 'कमीनो की लव्ह स्टोरी' आहे. सिनेमाला बॉलिवूड स्टार सलमान खानसुध्दा प्रमोट करत आहे. येत्या 10 ऑक्टोबर रोजी सिनेमा रिलीज होत आहे.