आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तप्तपदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेल्या 'दृष्टिदान' ही लघुकथा मानवी जीवनातील प्रेम, समर्पण आणि त्यागाचे प्रकर्षाने दर्शन घडवते. या कथेपासून प्रेरित होऊन दिग्दर्शक सचिन बळीराम नागरगोजे आपल्यापर्यंत माधव, मीरा आणि सुनंदाची कथा 'तप्तपदी' घेवून येत आहेत.
1930-40 च्या दशकामध्ये समाजात वाहणाऱ्या नवा विचारांचा आणि त्यातून घडणाऱ्या सामाजिक बदलांचा बारकाईने अभ्यास करुन दिग्दर्शक सचिन नागरगोजे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहेत.
कश्यप परुळेकर, वीणा जामकर श्रुती मराठे आणि नीना कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'तप्तपदी' मध्ये शरद पोंक्षे, अंबरीश देशपांडे आणि अश्विनी एकबोटे अशा ताकदीच्या कलाकारांचाही सहभाग आहे. या चित्रपटाला संगीत देण्याचे आवाहन रोहीत नागभिडे आणि सुमित बेल्लारी यांनी अत्यंत खुबीने पार पाडले असून गीते वैभव जोशी यांच्या अनुभवी लेखणीतून आली आहेत.
चित्रपटाच्या कथानकाच्या गरजेनुसार स्वातंत्र्यापूर्व काळ आणि आवश्यक असलेली भव्यता पडद्यावर उतरवण्यासाठी विशेष कष्ट 'तप्तपदी' च्या टीमने घेतले आहेत. व्हाईटपेपर कम्युनिकेशन्स या चित्रपट निर्मिती संस्थेद्वारे सचिन बळीराम नागरगोजे आणि हेमंत भाईलाल भावसार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.