आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टूरींग टॉकीज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले टॉकीज, आपला व्यवसाय टिकावा म्हणून रक्ताचे पाणी करणा-या चांदी नावाच्या मुलीची रंजक, धाडसी आणि संघर्षमय कथा 'टूरींग टॉकीज' या सिनेमात साकारण्यात आली आहे. 'टूरींग टॉकीज' अर्थात फिरते तंबू चित्रपटगृह चालवणा-या लोकांचा भवताल, त्यांचे राहणीमान, त्यांचा कडवा जीवन संघर्ष या सिनेमात उलगडण्यात आला आहे. प्रेम, राग, लोभ, ईर्ष्या, आसक्ती, अहंकार अशा मानवी भावनाची आंदोलन टिपणारा हा सिनेमा आहे.

चांदीची रफ आणि टफ भूमिका साकारली आहे अभिनेत्री तृप्ती भोईरने. तर अभिनेता किशोद कदम या सिनेमात राजा रंगीलाच्या भूमिकेत आहे. शिवाय सुबोध भावे, सुहास पळशीकर. मिलिंद शिंदे, वैभव मांगले, नेहा पेंडसे आणि बालकलाकार चिन्मय संत यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. दक्षिणेतले सुप्रसिद्ध संगीतकार इलया राजा यांनी या सिनेमाला संगीत दिले असून गजेंद्र अहिरे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. येत्या 19 एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.