आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंशवेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या अकाली निधनामुळे 'वंशवेल' या सिनेमाच्या प्रदर्शनाबाबतीत त्यांच्या चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र राजीव पाटील यांचे स्वप्न असलेला 'वंशवेल' हा सिनेमा ठरविलेल्या दिवशीच म्हणजे 18 ऑक्टोबरला रिलीज होतोय. राजीव पाटील आपल्या आगामी 'वंशवेल' या सिनेमासाठी खूप उत्सुक होते. हा सिनेमा घरोघरी पोहोचावा अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे ठरलेल्याच दिवशी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
हा सिनेमा ठरल्या तारखेला प्रदर्शित करण्याबरोबरच तो यशस्वी करणे हीच ख-या अर्थाने राजीव पाटील यांना श्रद्धांजली ठरेल अशी भावना या सिनेमातील कलाकारांनी व्यक्त केली.
या सिनेमात अंकुश चौधरी, किशोर कदम, सुशांत शेलार, शंतनू गंगावणे, मनिषा केळकर, नम्रता गायकवाड, विद्या करंजीकर, उषा नाईक या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
'वंशवेल' हा सिनेमा स्त्री पुरुष समानता हा विचार केवळ आदर्शापुरता मर्यादित न ठेवता त्याची अंमलबजावणी माणुसपणाच्या विचारातून करायला हवी हा उद्देश देणारा आणि एकत्रित कुटुंब पद्धतीवर सकारात्मकपणे भाष्य करणारा आहे.