आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यलो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘बालक पालक’ या सुपरहिट सिनेमानंतर प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर पुन्हा एकदा एका मराठी सिनेमाच्या निर्मितीसाठी एकत्र आले असून मुंबई फिल्म कंपनी आणि विवा इन- एन या निर्मिती संस्थेमार्फत ‘यलो’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘यलो’ या सिनेमाद्वारे भावनिक आणि विलक्षण अशी कथा प्रेक्षकांसमोर येणार आहे.
‘उत्तरायण’, ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, ‘बीपी’, ‘फॅशन’, ‘कॉर्पोरेट’," हिरोईन" ‘ट्रॅफीक सिग्नल’, ‘दबंग’ ‘दबंग २’ अशा सिनेमांसाठी उत्कृष्ट कॅमेरावर्क करणारा प्रतिभावंत सिनेमेटोग्राफर म्हणजे महेश लिमये. गेली कित्येक वर्ष अनेक जाहिराती तसेच सिनेमांसाठी सिनेमेटोग्राफर म्हणून काम केल्यानंतर महेश लिमये आता 'यलो' या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शकाच्या भूमिकेतून आपल्या दिसणार आहे.
'यलो' सिनेमाचे कथानक एका सत्य कथेवर आधारित आहे. या सिनेमासाठी उपेंद्र लिमये, मृणाल कुलकर्णी, ऋषीकेश जोशी, मनोज जोशी, ऎश्वर्या नारकर, उषा नाडकर्णी, शिखर हितेंद्र ठाकूर आणि प्रविण तरडे असे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार एकत्र आले असून त्यांच्या अभिनयाची जादू 'यलो' मधून बघायला मिळेल. यलो सिनेमातील सर्वात महत्वाचं आकर्षण म्हणजे गौरी गाडगीळ आणि संजना राय यांचा उत्तम अभिनय ! जो आपल्या काळजाला भिडणार आहे.
सिनेमातील काही खास दृश्य आम्ही बॅंकॉकला जाऊन शूट केली आहेत. एका सत्य कथेवर आधारित सकारात्मक भावनांची कथा असलेला 'यलो' हा सिनेमा येत्या 4 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.