आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओ तेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या सिनेमात पुलकित सम्राट आणि याच सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा नवोदीत अभिनेता बिलाल अमरोही हे दोघे पत्रकाराच्या भूमिकेत आहेत. ते आपसात प्रसिध्द पत्रकार होण्याची पैज लावतात. परंतु त्यामध्ये ते वाईट पध्तीने अपयशी ठरतात. एक दिवशी ते अद्रकीच्या संदर्भातील बातमी अशाप्रकारे प्रदर्शित करतात, की लोक अद्रकाची पुजा करायला लागतात.
दिग्दर्शक अमेश बिष्ट यांच्या सांगण्यानुसार, सिनेमात सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. ज्या घटना सध्या देशात घडत आहेत त्यांना सादर करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.
सलमान खानसुद्दा आपली बहीण अलवीरा आणि भावोजी अतुल अग्नीहोत्रीच्या या सिनेमात मोठे योगदान देते आहे. 'ओ तेरी'चा प्रोमो सलमानच्या 'जय हो' सोबतच रिलीज करण्यात आला होता. तो सिनेमात नॅरेटरची भूमिका साकारत आहे.
पुलकित यापूर्वी 'बिट्टू बॉस', 'फुकरे' आणि 'जय हो'मध्ये दिसला होता. याव्यतिरिक्त 'क्या सुपर कूल है हम' फेम सराह आणि मंदिरा बेदीसुध्दा सिनेमात दिसणार आहेत.