आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'छत्रपती शिवाजी\' अ‍ॅनिमेशनपट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता म्हणून समस्त मराठी मनांवर ठसा उमटविणारा सहिष्णू राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज... अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत... त्यांच्या तेजस्वी जीवनावर आजवर अनेक कादंब-या, चित्रपट आणि मालिकांची निर्मिती झाली. आता निर्माते अझहर खान यांच्या अमन अनम फिल्म प्रॉडक्शन कंपनीद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचे विलक्षण चरित्र प्रथमच अ‍ॅनिमेटेड सिनेमाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांसमोर येत आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे 'छत्रपती शिवाजी' हा अ‍ॅनिमेटेड सिनेमा मराठीसह हिंदी भाषेतही रिलीज होणार आहे.

300 वर्षे पारतंत्र्यात भरडल्या गेलेल्या रयतेला शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न दाखविले. मुघल, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही अशी चहूबाजूंनी आक्रमक होत असताना शिवरायांनी मर्द-मराठ्यांच्या मनात स्फुल्लिंग चेतवलं आणि बघता-बघता त्याचा वणवा झाला. त्यांच्या शौर्याच्या, क्रांतीच्या गाथा आजही आपण मोठ्या अभिमानाने पाहतो,ऐकतो. हाच सर्व दैदिप्यमान इतिहास छत्रपती शिवाजी या अ‍ॅनिमेशनपटातून पुन्हा आपल्या समोर येणार आहे.

सिनेमाची कथा-पटकथा-संवाद लेखन जगमोहन कपूर, अझहर खान आणि कार्तिकेय तिवारी यांनी मिळून केले आहे. गीतकार कार्तिकेय तिवारी आणि आनंदु यांनी लिहिलेल्या गितांना कार्तिकेय तिवारी, राम गौतम या संगीतकार द्वयींने संगीत दिले आहे. कैलाश खेर, जावेद अली, साधना सरगम, मधुश्री, संजीवनी या गायकांनी ही गाणी आपल्या आवाजात स्वरबद्ध केली आहेत.

अझहर खान आणि आनंद सिंग दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 2 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.