आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किल दिल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'किल दिल' हा यशराज बॅनरचा सिनेमा आहे. या रोमँटिक अॅक्शन सिनेमात परिणीती चोप्रा आणि रणवीर सिंह मेन लीडमध्ये आहेत. याशिवाय राणी मुखर्जी आणि अली जाफर हे कलाकारसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत सिनेमात झळकणार आहेत. गोविंदाचीही वेगळी भूमिका या सिनेमात असणार आहे.
या सिनेमात मेन लीड साकारणारे रणवीर आणि परिणीती या दोघांनीही आपल्या करिअरची सुरुवात यशराज बॅनरच्या सिनेमातूनच केली होती. रणवीरचा पहिला सिनेमा बँड बाजा बारात होता, तर परिणीती यशराजच्या 'लेडीज वर्सेस रिकी बहल' आणि 'इशकजादे' या यशराजच्या सिनेमांमध्ये झळकली होती.
'किल दिल' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा शाद अली यांनी सांभाळली आहे. यापूर्वी शाद यांनी ‘झूम बराबर झूम’(2007), ‘बंटी और बबली’(2005) आणि ‘साथिया’(2002) या सिनेमांचे दिग्दर्शन केले होते. आदित्य चोप्रा या सिनेमाचा निर्माता आहे. तर शंकर, एहसान, लॉय हे त्रिकुट या सिनेमाचे संगीतकार आहेत. 2004 मध्ये रिलीज झालेल्या 'किल बिल' या हॉलिवूड सिनेमावर आधारित हा सिनेमा येत्या 5 सप्टेंबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज होतोय.