आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँग बँग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बँग बँग' 'नाइट अँड डे' या हॉलिवूड सिनेमाचा रिमेक आहे. त्यामध्ये नायक-नायिका दोघेही अ‍ॅक्शन, डान्स आणि एकमेकांवर जिवापाड प्रेम करताना दिसतात. या सिनेमात हृतिक आणि कतरिना अशाच अवतारात दिसणार आहे. हृतिकच्या पात्राचे नाव राजीव नंदा आणि कतरिनाच्या हरलीन साहनी आहे. सिनेमासाठी कॅट-हृतिकने खास तयारी केली आहे.
सिनेमात या दोन्ही कलाकारांशिवाय डॅनी डँग्जोप्पा ओमारच्या भूमिकेत जावेद हामिद गुलच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्यासह अनेक हॉलिवूड स्टार्ससुध्दा सिनेमात काम करत आहेत. रॉन स्मोरेनबर्ग हेंचमॅनच्या पात्रात, डेमिअन माविस गँगस्टरच्या पात्रात दिसणार आहेत. सिनेमाचे शूटिंग यूरोपमध्ये करण्यात आले आहे. हा एक अ‍ॅक्शन आणि रोमँटिक सिनेमा आहे.
'बँग बँग' सिध्दार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे. ज्यांनी 'सलाम नमस्ते', 'अंजाना अंजानी', 'बचना ए हसीनो' सिनेमा दिग्दर्शित केले आहेत. सिनेमा फॉक्स स्टार स्टुडिओने निर्मित केला असून विशाल-शेखरने संगीत दिले आहे. येत्या 2 ऑक्टोबरला सिनेमा थिएटरमध्ये दाखल होत आहे.