आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्र्याचा बिनधास्त अर्जुन आणि गोकुळची नटखट सोनाक्षी सिन्हा यांच्या भोवती सिनेमाची कथआ गुंफण्यात आली आहे. सिनेमात सोनाक्षी गोकुळची तरुणी आणि अर्जुन आग्र्याचा तरूण आहे. दोघांना एकमेकांवर प्रेम होते आणि ते ताजमहल पाहण्यास येतात. 'तेवर'मध्ये खलनायकाची भूमिका मनोज वायपेयी साकारत आहे. हा एक रोमान्स-अॅक्शन सिनेमा आहे.
बोनी कपूर आणि संजय कपूर निर्मित या सिनेमाचे शूटिंग आग्र्यामध्ये करण्यात आले आहे. आग्र्यामध्ये सिनेमाचे शूटिंग करण्याविषयी संजय कपूरचे म्हणणे होते, की आग्र्याच्या हरवलेल्या गल्या, स्मारक आण प्रसिध्द ठिकाण यात शूट करण्यात आले आहेत, जे प्रेक्षकांच्या पसंतील पडतील. सिनेमातील सांस्कृती आणि प्रेमळपण प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल. सिनेमाचे शूटिंग राजस्थानच्या काही लोकेशन्वरसुध्दा करण्यात आले आहे.
सिनेमाची निर्मिती बीएसके नेटवर्क अँड इंटरटेनमेंट बॅनर अंतर्गत करण्यात आली आहे. यशराज फिल्म्सचे डिस्ट्रिब्यूटर आहे. सिनेमाचे म्यूझिक साजिद-वाजिद यांनी दिले आहे. तसेच एडिटींग आदित्य चोप्राने केले आहे. हा सिनेमा 9 जानेवारी 2015 रोजी रिलीज होणार आहे.