आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुबसुरत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'खुबसुरत' सिनेमामध्ये सोनम कपूर मुख्य भूमिका साकारत आहे. तिच्या पात्राचे नाव मिली आहे. एका मॉर्डन तरुणीभोवती सिनेमाची कहानी गुंफलेली आहे. ती एक रॉयल कुटुंबाचे आयुष्य पूर्णत: बदलून टाकते. त्यांच्या आयुष्यात नवीन रंग भरायला सुरूवात करते. सिनेमात कॉमेडी आणि रोमान्स पाहयला मिळणार आहे.

सोनमसह फवाद अफजल खान, प्रोसेनजीत चटर्जी, किरण खेर, रत्ना पाठक, आमिर रजा हुसैन, आदिती राव हैदर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. रेखा यांच्या 'खुबसुरत'मध्ये राकेश रोशन, दीना पाठक आणि अशोक कुमार होते.
सोनमच्या सिनेमाला बहीण रिया कपूर, वडील अनिल कपूर यांनी निर्मित केले आहे. या दोघांसह सिध्दार्थ रॉय कपूरनेसुध्दा सिनेमामध्ये पैसा गुंतवला आहे. सिनेमा अनिल कपूर फिल्म्स कंपनी आणि यूटीव्ही मोशन पिक्चर्सव्दारा वितरीत केला जाणार आहे. हा सिनेमा भारतात 19 सप्टेंबर 2014मध्ये हिंदी भाषेत रिलीज होणार आहे.