आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

72 मैल एक प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अक्षय कुमार आणि अश्विनी यार्दी यांच्या 'ग्रेझींग गोट पिक्चर्स' निर्मित, 'व्हायकॉम 18' प्रस्तूत बहुचर्चित '72 मैल एक प्रवास' हा सिनेमा येत्या 9 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लेखक अशोक व्हटकर यांच्या '72 मैल' या कादंबरीवर आधारित असलेल्या या सिनेमात एका मुलाचा आपलं जीवन समृद्ध करण्यासाठीचा संघर्ष चित्रीत करण्यात आला असून सोबत त्यावेळेच्या ग्रामीण जीवनाचे अंतरंग उलगडले आहे.

राजीव पाटील दिग्दर्शित या सिनेमाच्या माध्यमातून अक्षय कुमार पहिल्यांदाच मराठी चित्रपटाच्या निर्मितीत उतरला आहे. या सिनेमात अभिनेत्री स्मिता तांबे, बालकलाकार चिन्मय संत, चिन्मय कांबळी, श्रावणी केळुसकर, आणि ईशा माने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आणि दिग्दर्शिक राजीव पाटील उपस्थित होते.

सिनेमाचे गीत आणि संवाद लेखक संजय कृष्णाजी पाटील असून संगीतकार अमितराज आहेत.