आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चश्मेबद्दूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1981 साली रिलीज झालेल्या 'चश्मेबद्दूर' या सिनेमाचा हा रिमेक आहे. ही कहाणी आहे आहे एका तरुणीच्या प्रेमात पडलेल्या तरुणाची. त्याच्या दोन मित्रांना मात्र त्याचे हे सुख बघवत नाही. ते दोघे काहीही करुन त्याचे ब्रेकअप घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. हे दोघे यासाठी कोणकोणत्या मार्गांचा अवलंब करतात हे या सिनेमात बघण्यासारखे आहे. हा एक कॉमेडी सिनेमा आहे.

मोठ्या पडद्यावर चांगल्या मित्रांची कहाणी खूप वेळा प्रेक्षकांनी बघितली आहे. मात्र ब-याच खंडानंतर अशा प्रकारचे कथानक असलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

या सिनेमात तीन मित्रांच्या भूमिकेत अली जाफर, सिद्धार्थ आणि देवांशू आहेत. तर तपसी पनू सिनेमातील प्रमुख अभिनेत्री आहे.

हा सिनेमा कॉमेडी किंग म्हणून ओळखले जाणारे डेविड धवन यांनी दिग्दर्शित केला आहे. पुन्हा एकदा डेविड धवन प्रेक्षकांना पोटधरुन हसवणार आहेत.