आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायवे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हायवे' ही कहाणी आहे एका अशा तरुणीची (आलिया भट्ट) जिला आपले आयुष्य मनमोकळेपणाने एन्जॉय करायचे आहे. ती एका मोठ्या उद्योजकाची मुलगी असून तिचे लवकरच लग्न होणार आहे. ती एका संध्याकाळी आपल्या भावी नव-यासह हायवेवर फिरायला निघते. मात्र वाटेत एक टोळी तिचे अपहरण करते.
अपहरणकर्ते तिचे अपहरण नक्की करतात, मात्र नंतर तिच्यामुळे उद्धवस्त झाल्याची जाणीव त्यांना होते. या टोळीचा प्रमुख (रणदीप हुड्डा) तिला परत पाठवण्याची तयारी करतो. ती टोळी या तरुणीला घेऊन देशातील अनेक हायवेंवर फिरत असते.
दिवसांमागून दिवस जात असतात. सुरुवातीला ती तरुणी या त्रासाला कंटाळते, मात्र हळूहळू परिस्थिती बदलू लागते. तिला हे नवे आयुष्य आवडू लागतं. अपहरणानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, अशी भावना त्या तरुणीच्या मनात निर्माण होते. तिला आपल्या पूर्वीच्या आयुष्यात परतायचे नसते.
टोळीच्या प्रमुखावर तिचा जीव जडतो. हा हायवेचा प्रवास असाच सुरु राहावा, अशी त्या तरुणीची इच्छा असते.
हा सिनेमा इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केला आहे. यापूर्वी त्यांनी जब वुई मेट, रॉकस्टार, लव आज कल या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे.
'हायवे' या सिनेमाला ए. आर. रहमान यांनी संगीत दिले असून येत्या 21 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.