आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जोकर' अक्षयचा ड्रामा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जोकर' ही कहाणी आहे पागलपूर या गावाची. अगस्त्य (अक्षय कुमार) हा सुशिक्षित तरुण पागलपूर या आपल्या गावात परत येतो. येथे आल्यानंतर गावाची दयनीय अवस्था पाहून तो खूपच दुःखी होतो. भारताच्या नकाशावर पागलपूरचे नावच नसल्याचे त्याच्या लक्षात येते. अगस्त्य संशोधक आहे. ब्रह्मांडातील एलिअन्सच्या अस्तित्वाचा तो शोध घेत आहे.
अगस्त्य आपल्या गावाला ओळख मिळवून देण्याचा निर्णय घेतो. गावाची जगात ओळख निर्माण व्हावी यासाठी अगस्त्य एक योजना आखतो. एलिअन्सशी संपर्क साधण्याचे यंत्र आपल्या गावात आणून तो तेथूनच आपल्या कामाला सुरुवात करतो. अखेर अगस्त्यला गावाला प्रसिद्धीझोतात आणण्याचा मार्ग सापडतो. आता हा मार्ग कुठला ? अगस्त्यच्या प्रयत्नाना यश मिळणार का ? पागलपूरची जगात ओळख निर्माण होणार का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या 'जोकर' या चित्रपटात मिळणार आहेत.
सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला 'जोकर' हा सिनेमा फराह खानचा नवरा शिरीष कुंदरने दिग्दर्शित केला आहे. येत्या ३१ ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होणार आहे.