आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉरर 'राज 3'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'राज 3' या चित्रपटाची कहाणी मैथिली (बिपाशा बासू), आदित्य (इमरान हाश्मी) आणि संजना (ईशा गुप्ता) या तिघांच्या भोवती गुंफण्यात आली आहे. मैथिली एक यशस्वी अभिनेत्री आहे. तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारायला मिळत असून अनेक पुरस्कार तिने आपल्या नावी केले आहेत. एका दिग्दर्शकावर मैथिलीचे प्रेम जडले आहे. हा दिग्दर्शक म्हणजे आदित्य. आदित्य आणि मैथिलीचे एकमेकांवर प्रेम असते. सगळे काही सुरळीत सुरु असताना संजना नावाच्या न्यूकमरची एन्ट्री होते. तिच्या येण्याने मैथिलीचे आयुष्यच पालटून जाते. अचानक आपल्याला विसरून सगळे जण संजनाबरोबर काम करण्यास इच्छूक असल्याचे मैथिलीला जाणवू लागते. लवकरच आदित्यही संजनासाठी मैथिलीला सोडून देतो. संजनाच्या आगमनामुळे मैथिलीचे करिअर ढासळत जाते आणि ती पागल होते. मैथिली काळ्या जादूचा सहारा घेते. संजनावर जादू करुन तिचे आयुष्य उद्धवस्त करण्याचा चंग मैथिली बांधते. पुढे मैथिली, आदित्य आणि संजनाच्या आयुष्यात काय काय घडामोडी घडतात हे आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 7 सप्टेंबर 2012 ला हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होत आहे.