आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फितूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध लेखक चार्ल्स डिकेन्स यांच्या 'ग्रेट एक्सपेक्टेशन' या गाजलेल्या कादंबरीवर 'फितूर' हा सिनेमा बेतला आहे. या रोमँटिक धाटणीच्या सिनेामत बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ फिरदौस ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तर 'आशिकी 2' फेम अभिनेता आदित्य रॉय कपूर कवी नूरच्या भूमिकेत दिसणार आहे.
यामध्ये अभिनेत्री तब्बूही एका महत्त्वाच्या भूमिकेत असले. या भूमिकेसाठी आधी रेखाची निवड झाली होती. मात्र त्यांनी सिनेमा नाकारल्यानंतर तब्बूची वर्णी यामध्ये लागली. या कलाकारांसह अदिती राव हैदरी, अक्षय ओबरॉय आणि अजय देवगणसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत सिनेमात झळकणार आहेत.
सिनेमाचे शूटिंग काश्मिरच्या सुंदर लोकेशन्सवर झाले आहे. दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी सिनेमाचा स्क्रिनप्ले लिहिला आहे. तर आदित्यचा भाऊ सिद्धार्थ रॉय कपूर याचे निर्माते आहेत. हा सिनेमा यावर्षी व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने 12 फेब्रुवारीला रिलीज होतोय.