आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

& जरा हटके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिध्द दिग्दर्शक रवी जाधव निर्मित आणि इरॉस इंटरनॅशनल प्रस्तुत या सिनेमात हटके लव्हस्टोरी बघायला मिळणार आहे. एका मध्यमवयीन स्त्री-पुरूषाच्या सुंदर नात्याभोवती सिनेमाची कथा रंगवण्यात आली आहे. मध्यमवयात पुन्हा विवाह करण्यासारखा धाडसी निर्णय हे जोडपं घेतं. मग त्याचं हे नातं त्यांची मुलं कसे स्वीकारतात, यावर हा चित्रपट अधोरेखित करण्यात आला आहे. त्यांच्यातील वाद, हेवेदावे आणि याबरोबरच ओघाने येणाऱ्या दोन पिढ्यांमधील अंतराचा समतोल ‘& जरा हटके’ या चित्रपटात मांडण्यात आला असून मराठी आणि बंगाली जोडप्याची ही प्रेमकथा आहे.

मिताली जोशी लिखित या सिनेमात शिवानी रांगोळे सोबत मृणाल कुलकर्णी, बंगाली अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता, सिद्धार्थ मेनन हे कलाकारही आपल्याला या सिनेमात पाहता येणार आहेत. नात्यांमधले बदलते स्वरूप दाखवणारा हा सिनेमा 22 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...