आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिजीत खांडकेकर, सतीश राजवाडे, उदय टिकेकर, स्मिता गोंदकर, संस्कृती बालगुडे, विनीत शर्मा, सिद्धार्थ बोडके, शेखर शुक्ला, धनंजय मांद्रेकर, नुपूर दुधवाडकर या कलाकारांच्या भूमिका यात आहेत. तामिळ, तेलगु व अरेबिक या तीन भाषांमध्ये भय हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची व संकलनाची जबाबदारी राहुल भातणकर यांनी सांभाळली आहे.
या चित्रपटाचे सहनिर्माते अजय जोशी असून आशिष चौहान कार्यकारी निर्माता आहेत. कथा पटकथा संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. कलादिग्दर्शन प्रशांत राणे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक अजय देवरुखकर असून सिनेमॅटोग्राफर राजेश राठोर आहेत.
या चित्रपटात तीन वेगळ्या जॉनरची गाणी आहेत. ‘साजणा’, ‘मी आलो’, या दोन गीतांना ब्रिजेश शांडिल्य व तुलिका उपाध्याय यांचा सुमधुर आवाज लाभला आहे. ही दोन्ही गाणी हटक्या पद्धतीने शूट केली गेली असून विशेष म्हणजे क्रुझ, हेलिपॅडवरील दृश्ये आणि दुबईतील गगनचुंबी इमारती तसेच प्रसिद्ध बीचेसची अनोखी सफर या गाण्यांद्वारे घडते. तर ‘चल रे’ हे गीत अली असलम यांनी स्वरबद्ध केलं आहे. शेखर अस्तित्व यांच्या गीतांना विक्रम माँटरोज यांचा संगीतसाज आहे.
बातम्या आणखी आहेत...