आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीटर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वीस एन्टरटेन्मेन्ट प्रस्तुत आणि प्रवीण कुमार जैन यांची निर्मिती असलेल्या 'चीटर' या सिनेमात अभिनेता वैभव तत्त्ववादी मेन लीडमध्ये आहे. त्याच्यासोबत हृषीकेश जोशी, आसावरी जोशी, सुहास जोशी आणि पूजा सावंत या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अजय फणसेकर यांचेच आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे ८० टक्के शूटिंग मॉरिशसमध्ये झाले आहे. कथेनुसार, एका मॉरिशसच्या प्राचीन हवेलीमध्ये चित्रपटाचे काही चित्रीकरण करण्यात आले आहे. जवळजवळ २० ते २२ दिवस मॉरिशसमध्ये सिनेमाचे शूटिंग झाले. एप्रिल महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणारेय.