आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाफ तिकीट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक समित कक्कड यांनी आशय व सादरीकरणात अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. आता ‘हाफ तिकीट’ च्या माध्यमातून दोन लहान मुलांच्या स्वप्नांचा अनोखा प्रवास ते घेऊन येणार आहेत. जगण्याचा संघर्ष व स्वप्नांचा पाठलाग करण्याचा ध्यास याचा मेळ साधत दोन लहानग्यांची धडपड ‘हाफ तिकीट’च्या माध्यमातून पहाता येणार आहे.
आपल्याकडे नसलेली, पण हवीहवीशी वाटणारी एखादी गोष्ट मिळवण्याचा सुंदर प्रवास व त्यासाठी लागणार.. ‘हाफ तिकीट’! हा लहानपणीच्या आठवणी ताज्या करणारा एक नॉंस्टेलजिक अनुभव असेल. शुभम मोरे व विनायक पोतदार हे दोन बालकलाकार सिनेमा मुख्य भूमिकेत आहेत.
शुभम मोरे व विनायक पोतदार या दोन बालकलाकारांसह भाऊ कदम, उषा नाईक, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, प्रियांका बोस, कैलाश वाघमारे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा एम माणिकदान यांची असून लेखन ज्ञानेश झोटिंग याचं आहे.
गीतलेखन क्षितीज पटवर्धन यांनी केले असून संगीताची जबाबदारी जी.वी प्रकाश यांनी सांभाळली आहे. छायाचित्रण संजय मेमाणे यांचं असून संकलन फैझल इम्रान यांचं आहे. साऊंड डिझाइन अनमोल भावे यांनी केलं असून कलादिग्दर्शन वासू पाटील यांचं आहे. कार्यकारी निर्माते मिलिंद शिंगटे, तन्मयी देव आहेत. लाईन प्रोड्यूसरची जबाबदारी आनंद गायकवाड, राहुल तुळसकर यांनी सांभाळली आहे.
बातम्या आणखी आहेत...