आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कापूस कोंड्याची गोष्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘कापूस कोंड्याची गोष्ट’ या चित्रपटात एका छोट्या गावामधील ४ बहिणींची कथा चित्रित करण्यात आली आहे. वडिलांच्या निधनानंतर चार बहिणी परिस्थितीचं गांभीर्य जाणून त्याला शरण न जाता त्याविरुद्ध कशा ठामपणे उभ्या राहतात याचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटात मांडला आहे. ऑस्करसहित अनेक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय महोत्सवांनी दखल घेतलेला हा सिनेमा १ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

गेली ४६ वर्षे अव्याहतपणे ग्रामीण भागात काम करण्याचा वसा भोसले कुटुंबियांनी घेतला आहे. ग्रामीण जनतेच्या व्यथा जाणून घेत त्यावर अभिनव कल्पनेने मात करण्याची जिद्द गावकऱ्यांना देणाऱ्या भोसले कुटुंबियांची तिसरी पिढी ही आता हा वारसा समर्थपणे पुढे नेत आहे.

कापूस कोंड्याची गोष्ट’ या चित्रपटात मकरंद अनासपुरे समिधा गुरु, भारत गणेशपुरे यांच्यासोबत गौरी कांगे, मोहिनी कुलकर्णी, व बालकलाकार नेत्रा माळी यांच्या भूमिका आहेत. कथा व संवाद प्रसाद नामजोशी यांचे आहेत. इंद्रजीत भालेराव यांच्या गीतांन शैलेश दाणी यांनी संगीतबद्ध केलं आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते प्रविण वानखेडे आहेत. छायांकन वसिम मणेर यांचे असून संकलन संतोष गोठोस्कर यांनी केले आहे़.

निर्माते नितीन भोसले व दिग्दर्शिका मृणालिनी भोसले यांनी चित्रपटातून मांडलेला सकारात्मक दृष्टीकोन प्रत्येकाला नक्कीच विचारप्रवृत्त करेल. येत्या १ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...