आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी सिनेमा : कुलकर्णी चौकातला देशपांडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गजेंद्र अहिरेंच्या सिनेमाची आतुरतेने वाट बघणा-या प्रेक्षकांना आता जास्त वेळ वाट नाही पाहावी लागणार. कारण गजेंद्र अहिरे यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ ची घोषणा केली आहे.
 
या चित्रपटाचा टीझर पोस्टर देखील रिलीज केला आहे. स्मिता फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत आणि विनय गानू निर्मित हा चित्रपट 29 सप्टेंबर 2017 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चोखंदळ प्रेक्षकांसाठी हा वेगळा आशय असलेला चित्रपट नक्कीच मेजवानी ठरेल. या चित्रपटातील प्रमुख कलाकारांबद्दलची माहिती अजूनही गुलदस्त्यातच आहे पण सिनेमाचं नाव आणि टीझर पोस्टर मात्र त्याबद्दलची उत्सुकता अजूनच वाढवतो, यात शंकाच नाही.
बातम्या आणखी आहेत...