आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी सिनेमा : मला काहीच प्रॉब्लेम नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या “मला काही प्रॉब्लेम नाही” म्हणणारे गश्मीर महाजनी आणि स्पृहा जोशी सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेले आहेत. त्यांचा हा आगामी चित्रपट नेमका कसा असणार आहे याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. स्पृहा आणि गश्मीर बरोबर मराठी चित्रपट सृष्टीतील निर्मिती सावंत, कमलेश सावंत, विजय निकम, मंगल केंकरे, साहील कोपर्डे, सीमा देशमुख, आरश गोडबोले, स्नेहलता वसईक व सतीश आळेकर यांसारखे नामवंत कलाकार देखील “मला काहीच प्रॉब्लेम नाही” म्हणतं असलेले दिसून येत आहेत.
 
समीर विद्वांस यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून पी. एस छतवाल, रीचा सिन्हा आणि रवी सिंह यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नात्यांची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटासाठी सौरभ, ह्रषिकेश दातार आणि जसराज जोशी यांचं संगीत असणार आहे तर छायाचित्रदिग्दर्शन प्रसाद भेंडे यांचं आहे. फिल्मी किडा प्रॉडक्शन्स निर्मित ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ हा चित्रपट येत्या 14 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.
बातम्या आणखी आहेत...