आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी सिनेमा : मांजा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोठ्या पडद्यावर एका चिंतीत आईच्या भूमिकेतून अश्विनी भावे यांनी या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. ‘मांजा’ चित्रपटाची कथा, पटकथा, आणि दिग्दर्शन दिग्दर्शक जतिन वागळे यांनी केलं आहे. ‘इंडिया स्टोरीज’ निर्मित मांजा चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच त्रिलोक मल्होत्रा आणि के. आर. हरीश या हिंदी सिनेसृष्टीतील निर्मात्यांनी मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अश्विनी भावे सोबतच या चित्रपटात ‘बालक पालक’ फेम रोहित फाळके आणि ‘डान्स इंडिया डान्स’ फेम सुमेध मुद्गलकर देखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

'मांजा' या चित्रपटाचे दिग्दर्शक जतिन वागळे यांनी या चित्रपटाचे काही पैलु उलगडले. जतिन सांगतात, ''हा चित्रपट नात्यांवर भाष्य करणारा आहे. आपण पतंग उडविताना मांजा हा प्रमुख घटक असतो. जर तुम्ही तो घट्ट पकडला तरी बोट कापु शकते आणि ढिल दिली तरी कापते. मग आपणच तो मांजा किती सैल सोडावा हे ठरविले पाहीजे. अशा प्रकारचे नात्यांचे बंध उलगडविणारा हा सिनेमा आहे.'' 

एमएफडीसी प्रस्तुत मांजा हा चित्रपट 21 जुलैला प्रदर्शित होणार आहे. नितीन केणी आणि मनीष वसिष्ट यांची एमएफडीसी ही कंपनी मराठी चित्रपट निर्मिती आणि वितरण या क्षेत्रात कार्यरत आहे.
बातम्या आणखी आहेत...