आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी सिनेमा : शेंटिमेंटल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'पोश्टर बोइज' आणि 'पोश्टर गर्ल'नंतर दिग्दर्शक समीर पाटील प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत नवीन कलाकृती 'शेटिमेंटल'. अभय जहिराबादकर, समीर पाटील, संतोष बोडके, मंजुषा बोडके निर्मित आणि आर. आर. पी. कॉर्पोरेशन, डॉ. अंबरीश दरक, बनी डालमिया प्रस्तुत ‘शेंटीमेंटल’ या चित्रपटातून मराठी सिनेमा ‘फर्स्ट टाईम’ बिहारला पोहोचणार असून महाराष्ट्र पोलिसांच्या एका ‘इंटर स्टेट ऑपरेशनची’ इंटरेस्टिंग कथा या चित्रपटाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे.

या चित्रपटात अशोक सराफ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्यासोबत उपेंद्र लिमये, विकास पाटील, पल्लवी पाटील, सुयोग गोऱ्हे, देवयानी यादव, रमेश वाणी, माधव अभ्यंकर, उमा सरदेशमुख, पुष्कर श्रोत्री, राजन भिसे, विद्याधर जोशी आणि रघुवीर यादव यांची ‘फुल टू कॉमिक अॅक्शन’ असणारा हा चित्रपट येत्या 28 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...