आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमात दोन कथा दाखवण्यात आल्या आहेत. एका देवी नावाच्या तरुणी आपल्या फेलो स्टुडेंट पियूषसोबत हॉटेलमध्ये जाते आणि पोलिस त्याला अश्लिल कृत्यांचा आरोपी सांगत अटक करतो. भ्रष्ट पोलिस देवीवर जबरदस्ती करून या आरोपांना कबूल करायला लावतात आणि तिचे म्हणणे रेकॉर्ड करतात. नंतर पोलिस या टेपव्दारे मिश्रा देवी आणि तिचा पती विद्याधर पाठक (संजय मिश्रा) यांना ब्लॅकमेल करतात आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी करतात.
दुस-या कथा, लोअर कास्टचा एक तरुणाची (विक्की कौशल) आहे. तो गंगा घाट (बनारस)च्या किना-यावर राहतो आणि मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम करतो. एक दिवशी दीपकची भेट एका उच्च जातीय तरुणीशी (श्वेता त्रिपाठी) होते. हळू-हळू दोघांमध्ये जवळीक वाढत जाते. मात्र दोघांची जात त्याच्या प्रेमात अडथळा बनते.
दोन्ही कथा कोण-कोणत्या वळणावरून जातात आणि त्यांच्या शेवट कसा होतो. या सर्व गोष्टी सिनेमा रिलीज झाल्यानंतर कळेल.
कान फिल्म फेस्टीव्हलमध्ये जिंकले दोन अवॉर्ड-
अलीकडेच 68व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाची स्क्रिनिंगमध्ये ठेवण्यात आली होती. सिनेमाला दोन स्पेशल कॅटागरीमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. 'मसान'ला पहिला पुरस्कार फेडरेशन इंटरनॅशनल प्रेस सिनेमॅटोग्राफीक इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटीक्स (एफआईपीआरईएससीआई) श्रेणीमध्ये मिळाला होता. त्यानंतर सिनेमाला अन्सर्टेन रिगार्ड सेक्शनमध्ये प्रॉमिसिंग फ्यूचर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...