आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कोर्ट' हा सिनेमा एका लोककलाकाराच्या आयुष्यातील न्यायालीन लढा वर्णन करणारा आहे. सेवाभावी वृत्तीने काम करणा-या एका लोककलाकाराला त्याने न केलेल्या चुकीसाठी कोर्टाची पायरी चढावी लागते. त्यानंतर जे घडतं ते 'कोर्ट' मध्ये पाहायला मिळेल.
'कोर्ट' मध्ये विरा साथीदार, विवेक गोम्बर, गीतांजली कुलकर्णी, प्रदीप जोशी, उषा बने, शिरीष पवार आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं छायांकन केमेरामन मृणाल देसाई यांनी केलं आहे. संगीतकार संभाजी भगत यांनी कथेला साजेसं संगीत दिलं असून रिखव देसाई यांनी अचूक एडिटिंग केलं आहे. सचिन लोव्हलेकर यांनी कॉश्च्युम डिझाइन केलं आहे, तर अनिता कुशवाहा आणि अमृत प्रीतम यांनी साउंड डिझाइनिंग केलं आहे.
आजवर जवळजवळ 30 चित्रपट महोत्सवांमध्ये 19 पुरस्कार पटकावत एक नवा विक्रम या चित्रपटाने प्रस्थापित केला आहे. याशिवाय अलीकडेच न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या न्यू डायरेक्टर्स न्यू फिल्म्स या चित्रपटात सहभागी होण्याचा बहुमान प्राप्त झाला. दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेच्या कोर्ट चित्रपटाने या चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याचा बहुमान पटकावत भारतीय चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.