आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडी चाळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्या दिवसात गाजलेली 'दगडी चाळ' तिच्या नावाचा दरारा आणि रुतबा काही औरच होता… याच दगडी चाळीवर आधारित 'दगडी चाळ' हा सिनेमा येत्या 2 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याकाळी ज्यांनी दगडी चाळीचा अनुभव प्रत्यक्ष अनुभवला आहे. त्यांच्या मनात त्या आठवणी नेहमीसाठी घर करून बसल्या आहेत. मंगलमूर्ती फिल्म्स आणि साई पूजा फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मंगलमूर्ती फिल्म्सने यापूर्वी देखील बऱ्याच हिंदी सिनेमांची निर्मिती केली असून मराठी चित्रपट निर्मितीचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे.
प्रतिकूल परिस्थितीत अपघाताने वाममार्गात अडकलेल्या एका सामान्य तरुणाच्या आयुष्याची कथा सिनेमात चित्रित करण्यात आली आहे. मराठी सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत दगडी चाळ हा पहिला वाहिला मराठी सिनेमा प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक असणारेय. या चित्रपटाचं केंद्रबिंदू गॅंगवॉर नसून त्यातील हळुवार फुलत जाणारी प्रेमकथा आहे.
सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनीही या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दिग्दर्शन करण्याचे शिवधनुष्य हाती घेतलंय. मराठी चित्रपटातील आघाडीचा अभिनेता अंकुश चौधरी, पूजा सावंत, संजय खापरे अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात धडाकेबाज आणि जोशपूर्ण असं गणपती बाप्पावर चित्रित केलेलं गाणं देखील आहे. गाणं ऐकताच क्षणी पाय थिरकतील असं दमदार संगीत देणारे अमितराज आणि गायक आदर्श शिंदे या जोडगोळीला ऐकण्याची संधी 'दगडी चाळ'च्या निमित्ताने पुन्हा मिळणार आहे.