आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेलकम जिंदगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या चित्रपटात एक मुलगा आणि एक मुलगी केंन्द्रस्थानी आहेत. एक मुलगी जिला जगण्यात स्वारस्यच उरलेलं नाही आणि एक मुलगा, जो तिच्या लेखी जीवनाचा अर्थ बनून जाईल. या सर्वातून मुक्त होण्यासाठी मीराला एकच मार्ग दिसतो, तो म्हणजे आत्महत्येचा.
'हॅपी एण्डींग सोसायटी' नावाची संस्था चालवविणारा आनंद प्रभू मीराला वाचवतो. मीराच्या अचानक बेपत्ता होण्याने तिचे वडील डॉ. राजवाडे हवालदील होतात आणि तिच्या शोधात जंग जंग पछाडतात. पुढे काय होतं मीरा आपल्या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवू शकते का? मीराला आपल्याबरोबर आणण्यात आनंदचा काही छूपा हेतू तर नसतो? डॉक्टर राजवाडेंची मीराशी भेट होते का? 'हॅपी एण्डींग सोसायटी' या संस्थेच काय रहस्य असतं? या प्रश्नांची उकल होण्यासाठी 'वेलकम जिंदगी' हा चित्रपट पाहायला हवा.
26 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन उमेश घाडगे यांनी केले असून, चित्रपटात स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, डॉ. मोहन आगाशे, प्रशांत दामले, भारती आचरेकर, पुष्कर श्रोत्री, मुरली शर्मा, उर्मिला कानिटकर-कोठारे या कलाकारांच्या भूमिका आहेत. तर महेश मांजरेकर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...