आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजामौलीच्या ‘बाहुबली’साठी चारच काय, सात वर्षेही दिली असती: प्रभास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘बाहुबली-२’ला चारच काय, पण मी सात वर्षेही दिली असती, असे मुख्य अभिनेता प्रभासने सांगितले. - Divya Marathi
‘बाहुबली-२’ला चारच काय, पण मी सात वर्षेही दिली असती, असे मुख्य अभिनेता प्रभासने सांगितले.
‘बाहुबली-२’चे तामिळ संगीत नुकतेच लाँच झाले. याप्रसंगी दिग्दर्शक राजामौली यांच्यासह चित्रपटातील सर्व मुख्य कलाकार उपस्थित होते. या कलाकारांनी प्रेक्षकांशीही संवाद साधला. एका प्रश्नाला उत्तर देताना ‘बाहुबली-२’ला चारच काय, पण मी सात वर्षेही दिली असती, असे मुख्य अभिनेता प्रभासने सांगितले. 

बाहुबलीला चार वर्षांचा वेळ लागला. या काळात प्रभासने अन्य कोणताही चित्रपट हातात घेतला नाही. पूर्ण वेळ त्याने चित्रपटासाठी दिला. संपूर्ण टीम बाहुबलीमय झाली होती. प्रत्येकाने आपले अनुभव शेअर करताना आता आम्ही एकत्र नाहीत याबाबत खंतही व्यक्त केली. राजामौली म्हणाले, ‘प्रभासमध्ये खूप प्रतिभा आहे. त्याच्यासारखा डेडिकेटेड अॅक्टर मी पाहिलेला नाही. त्याने बाहुबलीच्या व्यक्तिरेखेत स्वत:ला सामावून घेतले होते. सगळ्या टीमचा मी आभारी आहे.’
 
पुढील स्लाईडवर वाचा आणि पाहा बाहुबली - 2, बाहुबली- 3 चे  काही फोटोज.... 
बातम्या आणखी आहेत...