आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review:मारुती नाजरगोजेच्या तपासाची उत्कंठावर्धक गोष्ट आहे \'आपला मानूस\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेटिंग 3.5/5
कलाकार नाना पाटेकर, सुमीत राघनव, ईरावती हर्षे
दिग्दर्शक सतीश राजवाडे 
संगीतकार -
निर्माते अजय देवगण, काजोल 
श्रेणी थरारपट, फॅमिली ड्रामा

 

अजय देवगणची निर्मिती असलेला आपला मानूस या चित्रपटात अभिनेता नाना पाटेकर पुन्हा एकदा पोलिस अधिकाऱ्याच्या तडफदार भूमिकेत प्रेक्षकांसमोर आले आहे. विवेक बेळे यांच्या‘काटकोन त्रिकोण’या नाटकावर बेतलेला हा सिनेमा चांगलाच उत्कंठावर्धक आहे. एका वृद्ध व्यक्तीची आत्महत्या की खून याच्या आसपास चित्रपटाचे कथानक फिरते.

 

अशी आहे चित्रपटाची कथा..
राहुल (सुमीत राघवन ) आणि भक्ती (ईरावती हर्षे) हे दाम्पत्य शहरी जीवन जगत असतात. दोघेही नोकरी करत असल्याने ते घराकडे फारसे लक्ष देऊ शकत नाही. राहुल हा वकील तर भक्ती कॉलेजमध्ये शिक्षिका असते. या दोघांना घरात देता येणारा कमी वेळ आणि त्यांच्या घरात असणारे राहुलचे वृद्ध वडील यांच्यात शीतयुद्ध सुरु होते आणि रंगतो जनरेशन गॅपचा वाद, सूड आणि शेवटी त्यातून होणारा मृत्यूचा खेळ..
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि कलाकारांचा अभिनय...

बातम्या आणखी आहेत...