आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: नक्की चाखून पाहावा असाच आहे सोनाली-सिद्धार्थचा चविष्ट \'गुलाबजाम\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करिअरमध्ये स्थिरस्थावर होण्यासाठी परदेशात अर्थात लंडनला गेलेला आदित्य महाराष्ट्रात परततो आणि त्याचा साखरपुडा होतो. त्यानंतर एका डब्यातील जेवणामुळे राधा म्हणजेच सोनालीपर्यंत पोहोचतो. नाईलाज म्हणून खावा लागणारा आदित्यला त्या डब्याच्या जेवणात मायेची अनुभूती होते आणि ते जेवण बनवणाऱ्या व्यक्तीकडूनच मराठी पद्धतीचे जेवण शिकणार असा निर्धार तो करतो. यादरम्यान त्याला भेटते टीपीकल पुणेरी पद्धतीची राधा आगरकर अर्थात सोनाली कुलकर्णी. 

 

राधा आदित्यला अगोदर बराच त्रास देते पण नंतर त्यांच्यात शिक्षिका-विद्यार्थीचे प्रेमळ नाते तयार होते. आजच्या काळात जिथे करिअर, नोकरी करुन स्थिरस्थावर होण्याला प्राधान्य दिले जाते तिथे आदित्यसारखा लंडनहून परतलेला मुलगा केवळ मराठी पद्धतीचे जेवण शिकण्यासाठी इतका त्रागा का करुन घेईल याचा विचार मनात येत राहतो पण काही वेळानंतर आपण कथेमध्येच गुंग होऊन जातो. सोनाली कुलकर्णीने राधाची आणि सिद्धार्थने आदित्यची भूमिका चोख बजावली आहे. चित्रपटातील साधेपणा आपले मन जिंकून घेतो. 

 

वेशभूषेपासून संवाद आणि पार्श्वसंगीताचा उत्तम मेळ साधला गेला आहे. सचिन कुंडलकर यांनी या चित्रपटरुपाने मराठी खाद्यसंस्कृती आणि त्यावरुनच बनवण्यात आलेल्या या चविष्ट गुलाबजामची मेजवानी खास मराठी प्रेक्षकांच्या पुढ्यात मांडली आहे. ज्याप्रमाणे चविष्ठ गुलाबजाम खाल्ल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर जसे समाधानाचे भाव येतात त्याचप्रमाणे हा चित्रपट पाहून आल्यानंतरही हेच तृप्तीचे भाव तुमच्याही चेहऱ्यावर उमटलीत इतके मात्र नक्की. 

 

मधुरिमाच्या संपादीका मृण्मयी रानडे यांनी केलेले 'गुलाबजाम' चित्रपटाचे समीक्षण नक्की वाचा खाली दिलेल्या लिंकवर..

http://mrinmayeeranade.blogspot.in/2018/02/delicious-gulabjaam.html 

 

 

पुढच्या स्लाडवर पाहा, 'गुलाबजाम' चित्रपटाचा Trailer.....

बातम्या आणखी आहेत...