आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Movie Review: दमदार कथानकाच्या \'न्यूड\'ला आहे वास्तवाच्या स्पर्शाची किनार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूड मॉडेलिंगसारख्या बोल्ड विषयाला हात घालण्याचा मराठी सिनेसृष्टीचा पहिलाच आणि कौतुकास्पद प्रयत्न म्हणजे रवी जाधव यांचा चित्रपट न्यूड. गरज ही माणसाला कोणतेही काम करण्याला भाग पाडते पण तेच काम न लाजता आणि तितक्याच अभिमानाने साकारणारी चित्रपटातील यमूना पाहिली की आपले अंतकरणही भरुन आल्याशिवाय राहत नाही.

 

दिग्दर्शक रवी जाधव यांचा चित्रपट म्हटला की, त्यात काहीतरी नवीन लोकांना पाहायला मिळणार हे प्रेक्षकांच्या मनात पक्के असते. न्यूडमधील यमुना, चंद्राक्का, लहान्या ही मुख्य पात्रे ताकदीने प्रेक्षकांसमोर आणण्याला रवी जाधव यांचे कौतुक जितके करावे तितके थोडेच..

काय आहे चित्रपटाची कथा..


नवऱ्याच्या रंगीलेपणाला कंटाळून आपल्या मावशीकडे मुंबईला पळून आलेली यमुनाच्या संघर्षाची सुरुवात होते ते काम मिळवण्यापासून. आपल्या मुलाला उज्जवल भविष्य देण्यासाठी कामाच्या शोधात यमूना मुंबई पालथी घालते. यादरम्यान चित्रपटातील यमुनाच्या नजरेतील मुंबई, चित्रपटाची प्रत्येक फ्रेम वाखाणण्याजोगी आहे. फक्त फ्रेमच नाही तर चित्रपटाचा एकेक संवादही प्रेक्षकांच्या काळजाला भिडल्याशिवाय राहत नाही. 
 
कामाचा शोध यमुनाला मुंबईत जे. जे. स्कुल ऑफ आर्टस कॉलेजमध्ये नेऊन पोहचवतो आणि न्यूड मॉडेलिंगच्या अनोख्या विश्वात तिचा प्रवेश होतो. इतर कोणत्याही स्त्रीला पदार्पणात वाटेलच असे न्यूड मॉडेलिंग करताना यमूना थोडी बिचकते पण नंतर याचबळावर ती तिच्या मुलासाठी उज्जवल आयुष्याचे स्वप्न पाहत असते. पण एका ठराविक वेळेनंतर यमुनाचा मुलगाच तिच्या या कामाविरुद्ध तिला सुनावतो आणि तिच्यावर आरोप लावण्यास सुरुवात करतो. 

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, कसा आहे चित्रपटातील कलाकारांचा अभिनय..

बातम्या आणखी आहेत...