आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hindi Film Sonu Ke Titu Ki Sweety Movie Review, Sunny Singh, Nushrat Bharucha, Kartik Aaryan

Movie Review : प्रेम आणि मैत्रीचा मनोरंजक मसाला 'सोनू के टिटू की स्विटी'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेटिंग  3  स्टार 
दिग्दर्शक  लव्ह रंजन
कलावंत  कार्तिक आर्यन, नुसरत बरुचा, सन्नी सिंग, अलोकनाथ 
संगीत  रोचक कोहली- हनीसिंग- अमाल मलिक- सौरभ वैभव - झॅक नाईट-गुरु रंधवा आणि रजत नागपाल
पटकथा राहुल मोदी आणि लव्ह रंजन
श्रेणी  कौटुंबिक नाट्यपट

 

 

प्यार का पंचनामा, आकाशवाणीनंतर दिग्दर्शक लव्ह रंजनचा 'सोनू के टिटू की स्वीटी' हा चित्रपट पुन्हा एकदा मैत्रीच्या धाग्यांची वीण घट्ट करणारा आहे. तरुणाईला भावेल असा हा चित्रपट मनोरंजनाचे सर्व स्वाद असलेला आहे. थिरकायला लावणारी गाणी, दिलखुलास लाईफस्टाईल, पंच असलेले संवाद आणि उत्तम अभिनय असे सर्वकाही यामध्ये जुळून आले आहे. 


नर्सरीपासून सोबत असलेले सोनू आणि टिटू या दोन मित्रांची ही कहाणी आहे. प्रेम आणि मैत्री हीच त्यांच्या चित्रपटांची मध्यवर्ती थीम असते. यापुर्वी दिग्दर्शक रंजन यांनी केलेले प्यार का पंचनामा, प्यार का पंचनामा 2 हे दोन्ही चित्रपट याच धाटणीचे होते.  आजच्या तरुणाईला अपील होईल अशा पद्धतीची कथानकाची बांधणी त्यांनी अचूक केली आहे. मैत्रीसोबतच कुटूंबातील निखळ मैत्रीपुर्ण नातेसंबंधांवरही यामध्ये प्रकाश टाकला आहे.

 

मैत्री कायमच कोणत्याही नात्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे, हा संदेश देण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न होता. त्यासाठी सोनू आणि टिटूतील मैत्री खूप सुरेख पद्धतीने दिग्दर्शकाने दाखवली. यासाठी पेरलेले प्रसंग  काळाशी सुसंगत अन मनोरंजनाने परिपूर्ण आहेत. पूढे  स्विटी टिटूच्या आयुष्यात येते अन त्याच्यात बदल होऊ लागतो, अन मग सोनू मैत्रीबद्दल अधिक जागरुक होतो. स्विटी चांगली मुलगी नाही याची त्याला जाणीव होते. पण, ते टिटूला पटवून सांगता येत नाही. यासाठी तो दोन तीन वेळा  स्विटीची चालाखी सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो, पण अयशस्वी ठरतो. हे प्रसंग दिग्दर्शकाने उत्तम सजवले आहेत.

 

स्विटी मात्र साखरपुडयानंतर सोनूला सरळ आव्हानच देऊन टाकते.  आता सोनूला मित्राला वाचवायचे असते. मात्र, सोनू तिला हरवण्यासाठी करत असलेला प्रत्येक प्रयत्न ती हाणून पाडते. ही बाब प्रेक्षक म्हणून खटकते. कारण, सोनू हा अतिशय चाणाक्ष मुलगा असल्याचे सुरुवातीपासून दाखवण्यात आले आहे. तरीही स्विटी त्याचा प्रत्येक डाव उधळून लावते, त्यामुळे चित्रपटात चांगलीच चुरस निर्माण होते. यामुळे प्रेक्षक गुंतून राहतात. चित्रपटाचा शेवट चकीत करणारा असेल अशी अपेक्षा चित्रपट पाहताना प्रेक्षकांची होते. मात्र, शेवट त्या अर्थाने चकीत करत नाही.  

 

मैत्रीतील भावनेचा धागा किती धट्ट असतो, हे सांगण्यात मात्र दिग्दर्शक यशस्वी होतो. चित्रपटात मनोरंजनासाठी असलेला संपूर्ण मसाला आहे. थिरकायला लावणाऱ्या गाण्यांवरी धमाल छान रंगली आहे. राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटाप्रमाणे अर्धावेळ विवाहाचा मौसम चित्रपटात अनुभवता येतो. 

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, काय आहे कथानक, कसा आहे कलाकारांचा अभिनय आणि बरंच काही... 

बातम्या आणखी आहेत...