आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: विभत्स राजकारणाचा बुरखा फाडणारा \'दास देव\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट

 

दास देव
रेटिंग 4  स्टार 
कलावंत राहुल भट्ट, रिचा चढ्ढा, आदिती राव हैदरी, सौरभ शुक्ला, विनीतकुमार सिंग, दिलीप ताहिल, दिपराज राणा, अनुराग कश्यप, विपीन शर्मा, सुशिला कपूर, जयशंकर पांडे, योगेश मिश्रा आणि श्रृती शर्मा
दिग्दर्शक सुधीर मिश्रा
कथा सुधीर मिश्रा
संगीत विपीन पटवा-संदेश शांडिल्य-शामिर टंडन-अनुपमा राग-सत्या अफसर आणि अर्को मुखर्जी
श्रेणी

राजकीय


 

 

'दुनिया मे हर चीज फिक्स हो सकती है धंदे, रिश्ते, सियासत सिवाय इश्क के' हा संवादच आज प्रदर्शित झालेल्या "दास देव' चित्रपटाबद्दल सर्वकाही सांगून जातो.  राजकारणाचा विभत्स बुरखा फाडणारा सुधीर मिश्रा दिग्दर्शित 'दास देव' जबरदस्त आहे. राजकारण, नातेसंबंध, प्रेम आणि व्यवसाय यांची उत्तम गुंफण असलेला हा चित्रपट शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवणारा आहे.

 

'देवदास' चित्रपटाशी सार्धम्य असलेल्या 'दासदेव' चित्रपटात देव, पारो आणि चांदणी आहेत. त्रिकोणी प्रेमकहाणीसोबतच यामध्ये विकृत राजकारणातील वास्तवही आहे. राहूल भट्ट, आदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, सौरभ शुक्ला, विपीन शर्मा अशा सर्वांचाच दमदार अभिनय यामध्ये आहे. पहिल्या फळीतील कलावंत नसतानाही दिर्घकाळ स्मरणात राहिल अशी कहाणी ताकदीने सर्वांनी मांडली आहे.   

 

'पावर की ख्वाहीश हो तो दिल के मामलो को जरा दुर रखना चाहिये, आडे आते है' अशा संवादातून चित्रपटाचा दमदारपणा लक्षात येतो. स्वत: मिश्रा यांनी लिहिलेली ही कहाणी तर दमदार आहेच पण जयदीप सरकार यांनी लिहिलेली पटकथा आणि संवादही तितकेच लक्षवेधी आहेत. चित्रपटातील एक प्रसंग राजीव गांधींची हत्या आणि दुसरा प्रसंग राहूल गांधीच्या दौऱ्यात कशा पद्धतीने मीडिया हाताळला यावर बोट ठेवणारा आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्राची मांडणी मुद्देसुद आहे. विनाकारण वाटावे अशी एकही फ्रेम नाही, असे जाणवते.  

 

प्रत्येक व्यक्तीरेखा विशेष महत्त्व असलेली आहे.  भूमिका मोठी असो किंवा छोटी तिची मांडणी चित्रपटात अचूकरित्या झाली आहे. राजकारणाच्या पार्श्वभूमीवर समांतर चालणारी प्रेमकथाही ताकदीने फुलवली आहे. एक पेच सुटत आला की नवी गुंफण पेरण्याचे दिग्दर्शकाचे कौशल्य प्रेक्षकाची उत्कंठा वाढवणारी आहे.  उत्तम अभिनय क्षमता आणि कलेशी प्रमाणिक असलेला प्रत्येक कलावंत या चित्रपटाशी जोडलेला आहे. 

 

पुढे वाचा, काय आहे चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय आणि यासह बरंच काही...

बातम्या आणखी आहेत...