आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चित्रपट | नानू की जानू |
रेटिंग | 2 स्टार |
कलावंत | अभय देओल, पत्रलेखा आणि मनु रिशी |
दिग्दर्शक | फराज हैदर |
कथा/पटकथा/संवाद | मनु रिशी |
संगीत | साजिद-वाजिद-गुणवंत सेन-सचिन गुप्ता आणि बबली- मीरा |
श्रेणी | विनोदी भूतपट |
'नानू की जानू' या शिर्षकामध्येच विनोद असल्याचे दिसून येते. भूत आणि माणसातील हलकी फुलकी प्रेमकथा आज प्रदर्शित झालेल्या 'नानू की जानू'मध्ये आहे. विनोदी अंगाने बांधण्यात आलेली ही कहाणी मनोरंजन करणारी आहे. मात्र, लक्षात राहिल अशी मुळीच नाही. अभयकडून प्रेक्षकांना दमदार सादरीकरणाची अपेक्षा आहे, ती यामध्ये पूर्ण होत नाही.
2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पिसासू' या तमिळ चित्रपटाचा हा रिमेक होता. अपघाती मृत्यू झालेल्या तरुणीची आत्मा भटकत राहते. अन ती गँगस्टर असलेल्या नानूच्या प्रेमात पडते. त्याच्या घरात ती राहू लागते अन् त्याच्या घरात अचानकपणे काही हालचाली होऊ लागतात. यामुळे नानूचेही आयुष्य बदलून जाते.
चित्रपटातील भूताला नेमके काय हवे आहे याचे रहस्य काही काळ खिळवून ठेवणारे आहे. यासोबतच विविध प्रसंगांमध्ये गुंफलेले विनाद प्रेक्षकांची उत्सुकता बनवून ठेवणारे आहेत. अभय देओलकडून प्रेक्षकांच्या निराळ्या अपेक्षा आहेत. इंटेलेक्च्युल विनोद करण्याची अभयची हातोटी यामध्ये जुळलेली दिसत नाही. कमी पण, लक्षात राहतील असे चित्रपट करण्याचा त्याचा स्वभाव आहे. मात्र, या चित्रपटात तो योग जुळून आलेला नाही. लोकांची घर रिकामी करून घेण्याचे काम नानू आणि त्याचे चार मित्र करत असतात. नानूची या धंद्यात चांगलीच दहशत असते. मात्र, घरात भूत आल्यापासून त्याचे व्यक्तिमत्त्वच बदलून जाते.
पुढे वाचा, काय आहे चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय आणि महत्त्वाचे चित्रपट बघायला हवा की नको...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.